राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळात राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाच्या अनुवादावरुन विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते.‘अर्थसंकल्पीय अधिवेशना वेळी राज्यपाल हे नेहमी अभिभाषण करतात. जेव्हा-जेव्हा ते इंग्रजीतून भाषण करतात तेव्हा-तेव्हा त्या भाषणाचं मराठीतून अनुवाद केला जातो. मात्र, आजच्या भाषणादरम्यान मराठी अनुवाद ऐकू आला नाही. त्यामुळे शिक्षणमंत्री तावडेंना धावपळ करुन नियंत्रण कक्षातून मराठीत अनुवाद करावा लागला. हे अतिशय गंभीर आणि निषेधार्ह आहे. खरं तर हा विषय सभापती आणि अध्यक्ष यांच्या अखत्यारितील आहे. पण माझी त्यांना अशी विनंती आहे की, या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. इतकंच नव्हे तर आज संध्याकाळपर्यंत दोषींवर कारवाई करुन त्यांना घरी पाठवण्यात यावं. हा संपूर्ण प्रकार विधीमंडळच्या अंतर्गत येत असला तरी मी याप्रकरणी सभागृहाची स्पष्टपणे माफी मागतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews